पीएम किसान योजना

आनंदाची बातमी ! पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळणार. 2000 ऐवजी 4000 मिळणार ,काय आहे सरकारची योजना ?

आनंदाची बातमी ! पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळणार. 2000 ऐवजी 4000 मिळणार ,काय आहे सरकारची योजना ?Good news! Farmers will get double the amount of PM Kisan Yojana. 4000 instead of 2000, what is the government’s plan?

टीम कृषी योजना / Krushi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana : बिहार राज्याचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी नुकतीच केंद्रातील कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्ली मध्ये भेट घेऊन पीएम किसान योजनेद्वारे मिळत असलेली 2000 ही रक्कम दुप्पट करण्याबाबतची चर्चा केली.

वाचा ही महत्वाची बातमी – सौर पॅनेलवर सबसिडी: 40 टक्के सबसिडीवर घराच्या छतावर सौर पॅनेल बसवा मिळेल मोठा लाभ.

पीएम किसान PM KISAN सन्मान निधी योजने तुन लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजने द्वारे जमा होणाऱ्या 2000 रुपयांच्या ऐवजी 4000 रुपये बँक खात्यात हफत्याच्या रुपात येऊ शकतात. अनेक न्यूज माध्यमांनी दिलेल्या अहवालां नुसार विश्वास ठेवला तर मोदी सरकार लवकरच लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते. एक अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मिळणारी 2000 रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत असून जर हे शक्य झाल्यास यापुढे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळतील.

 

बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी नुकतीच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली. मात्र, या वर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!