अहमदनगर जिल्ह्याचा पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज व कृषी सल्ला. पुढील 3 दिवस या तालुक्यात पडणार जोरदार पाऊस.Ahmednagar district weather forecast and agricultural advice for next 5 days. Heavy rain will fall in this taluka for next 3 days.
टीम कृषी योजना / Krushi Yojana
अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि. २०, २२ व २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कृषि सल्ला:
(१) पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी. २) पावसाळ्यात फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. ३) पिकावर कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी करताना योग्यती खबरदारी काळजी घ्यावी.
४) शेतीचे कामे करताना कामगाराना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होइल आणि योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईल. शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे. ५) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. ६) वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा.
संक्षिप्त संदेश सल्ला:
दि. २०, २२ व २३ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर फवारणी करावी.
पिक निहाय सल्ला:
खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १२ मिली ट्रायझोफॉस ४०% प्रवाही प्रति सोयाबीन फवारावे. सोयाबीन उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच एकरी ८ ते १० पक्षी थांबे शेतात लावावेत. १० लिटर पाण्यात मिसळून शेत तणमुक्त ठेवावे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
कपाशी :
फुलकिडे या रस शोषणार्याक किडींच्या नियंत्रणासाठी १२ मिली फिप्रोनील ५% प्रवाही किंवा २ कपाशी ग्रॅम थायामिथाक्झाम २५ डब्ल्यू जी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
ऊस:
पोंग्यातील पिठ्या ढेकून या किडीच्या नियंत्रणासाठी १५ मिली मानोक्रोटोफॉस ३६% प्रवाही प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,
मुगः शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.
भुईमूग : अळीच्या व्यस्थापणाकरिता १ मिली एस एल एन पी व्ही ५ ग्रॅम बिकेरिया बेसिअना १० ली पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.
मका : पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आल्यास स्पिनेटोरम ०.५ मका लिटर पाण्यातून फवारावे. अळीचा प्रादुर्भाव लक्ष्यात येण्यासाठी प्रति एकरी चार कामगंध सापळे लावावेत.
भेडी: या पिकात पानांच्या शिरा पिवळ्या पडून हळद येलो व्हेन मोझाँका या रोगाचा प्रसार पांढरी माशी व तुडतुडे या किडींद्वारे होण्याची शक्यता असते. या कीड व रोग नियंत्रणासाठी यायोमेथोक्झाम २५ डब्लूडीजी ४ ग्रॅम मेटॅलॅक्झिल एमझेड ७२, २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. + फळ पोखरणारी अळी फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी किनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ ईसी ८ मिली किंवा इमामेक्टीन बेनझोएट ५ डब्लूजी ४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी.
फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:
फळे आणि भाजीपाला पिक कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यासाठी लॅम्बडासायहॅलोथ्रीन ६ मिली टेब्युकोनेंझोल १० मिली स्टिकर १० मिली प्रति १० लीटर
पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करावे. किडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकावे आणि नष्ट करावेत. तोडणीनंतर किडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत, ल्यूसील्युर कामगंध सापळे हेक्टरी १०० या प्रमाणात वापरावे व तसेच त्यातील ल्यूर दोन महिन्याने बदलावा, तसेच अळीचे नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन १०% प्रवाही १० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ ईसी १० मिली किंवा स्पायनोसॅड ४५ ईसी ५ मिली किंवा क्लोरेंन्ट्रनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रति १० लीटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे. अधून-मधून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
टोमॅटो: फळसड आणि उशीरा येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल १० मिली किंवा
मेटॅलॅक्झिल अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम कॉपर ऑक्झिकलोराईड २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने गरजेनुसार १० दिवसाच्या दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन १० ऐसा १० मिली इमामेक्टीन बेनझोएट ५ डब्लुजी ४ ग्रॅम किंवा 8 क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एससी 2 of 2 मईड ३९.३५ एस्सी ३ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी. सदर फवारणी दरम्यान ५ टक्के निंबोळी अर्काची अधून-मधून फवारणी करावी.