अहमदनगर जिल्ह्याकरीता पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
दि. ३१/०८/२०२१ ते ०५ /०९/२०२१
Weather Forecast for the next five days for Ahmednagar District On 31/08/2021 to 05/09/2021
टीम कृषी योजना / Krushi Yojana
१) भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस अहमदनगर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील, तसेच पुढील दोन दिवस अकोले, कोपगाव, नगर, पारनेर, राहाता, राहुरी, संगमनेर, श्रीरामपुर या तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे व उर्वरीत तालुक्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२) कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
३) शेतात पाणी सचल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
४) पावसाने उघडीप दिल्यास पिकात करावायाची कामे (आंतरमशागतीची, तणनियंत्रणाची, खते देणे, फवारणी इ) पुर्ण करावीत.
५) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता “मेघदुत” व वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता “दामिनी” मोबाईल अँपचा वापर करावा.
ग्रामीण कृषि मौसम सेवा,
कृषि विद्या विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
- डिझेलपेक्षा स्वस्त सीएनजी ट्रॅक्टर, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फायदे