Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

अहमदनगर जिल्ह्याकरीता पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज ; या ‘तालुक्यात’ पाऊस पुन्हा ‘जोर’ धरणार.

अहमदनगर जिल्ह्याकरीता पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज ; या ‘तालुक्यात’ पाऊस पुन्हा ‘जोर’ धरणार. Weather forecast for next five days for Ahmednagar district; In this taluka, rain will be heavy again. 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

अहमदनगर जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे,धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने औगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत देखील धरणे भरलेली नाहीत. दि. २४/०८/२०२१ रोजी हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्याचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे.

१) भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस अहमदनगर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील तसेच दि. २५ ऑगस्ट रोजी जामखेड, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव तालुक्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२) तसेच कमाल तापमानात १ ते २ अश से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
३) भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, २९ ऑगस्ट ते ४ नोव्हेबर दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
४) पिकात करावयाचे खत व्यवस्थापन, फवारणी, आंर्तमशागतीची कामे हवामान कोरडे असताना करुन घ्यावीत.
५) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता “मेघदुत” व वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता “दामिनी” मोबाईल अँपचा वापर करावा असा सल्ला शेतकरी बांधवांना ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी. यांनी दिला आहे.

3 thoughts on “अहमदनगर जिल्ह्याकरीता पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज ; या ‘तालुक्यात’ पाऊस पुन्हा ‘जोर’ धरणार.”

Leave a Reply

Don`t copy text!